लोकशाही इफेक्ट : माध्यमिक शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत मंत्रालय पातळीवर मार्गदर्शन मागविले

0

सातारा (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली ‘दैनिक लोकशाही’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मंत्रालयातील महाराष्ट् शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी देणेबाबत मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दीड ते दोन वर्षापासून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मान्यते विना पडून होते. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच विविध माध्यमिक संघटना माध्यमिक शिक्षण विभागाकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा करत होत्या. परंतु दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे पारित केलेल्या शासन आदेशामध्ये माध्यमिक शिक्षकांच्या साठी वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाबाबत माध्यमिक शिक्षण विभागामध्ये संभ्रम होता. कारण या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक २ मध्ये जे शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र झालेले आहेत अशा शिक्षकांना सेवांतर्गत विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु सेवन कोणतेही सेवांतर्गत प्रशिक्षण घेतलेले शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी देता येईल किंवा कसे? याबाबत माध्यमिक शिक्षण विभागामध्ये संभ्रम होता आणि त्याच संदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने यापूर्वी विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर तसेच शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व संजय माने, अवर सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे याबाबत मार्गदर्शन मागविलेले आहे. मात्र अद्यापही संबंधित यांच्याकडून शिक्षकांच्या करिता वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन न आल्यामुळे आणि ‘दैनिक लोकशाही’ मध्ये या संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या बातमीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिनांक १४ सप्टेंबर, २०२० च्या पत्राने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई यांच्याकडे पुन्हा याच विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आलेले असून संबंधितांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असलेले शिक्षकांची यादी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.