पारोळा (प्रतिनिधी) : येथील महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांचे सामाजिक व अष्टपैलु कामगिरी पाहता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान नाशिक विभागच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली.
लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,धार्मिक,सांस्कृतिक,कला व क्रिडा क्षेत्रात अविरतपणे कार्य करित आहे.त्यामुळे संस्थेची व्याप्ती व प्रगतीचा आलेख वाढवत त्यातुन जनसामान्याचे कामे व्हावीत या हेतु ठेवत संस्थेच्या नाशिक विभागच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील यांची निवड संस्थेचे अध्यक्ष डाँ संजय अनुसया राजाराम सोनवणे यांनी नियुक्तीपत्र देवुन केली आहे.
त्यांच्या निवडीचे दर्पण पत्रकार संघाचे मार्गदर्शक भुपेंद्र मराठे,संघाचे अध्यक्ष रावसाहेब भोसले,उपाध्यक्ष अभय पाटील, दैनिक लोकशाही चे प्रतिनिधी अशोक कुमार लालवानी, यांचेसह पदाधिकारी यांनी केली आहे.पदाच्या माध्यमातुन गरजु व उपेक्षित कामांना न्याय देण्याची भुमिका आपली राहणार असल्याचे नुतन उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.