लोकवर्गणी तून होईल समाजाचा विकास : महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज

0

यावल | प्रतिनिधी 

हिंगोना: सद्या कोरो ना मुळे खूप बिकट काळ आहे.सर्वच अडचणीत आहेत.सरकार आपल काम करीत आहेत.पण सर्वस्वी सरकार वर अवलंबून चालत नाही.देश,देव व धर्म या तिघांचं ऋण आपल्यावर असत.त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सत्कर्म केलं पाहिजे.तेच काम गाजरे व चिर माडे परिवाराने केले आहे.समाजाच्या काही गरजा या लोक सहभागातून केल्या तर प्रश्न लवकर सुटू शकतात.रावेर यावल ही दोन्ही तालुके लोक सहभागासाठी सैदव तयार असतात ही विशेष बाब आहे. असे विचार महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी व्यक्त केले.स्व.प्रभाकर दामू गाजरे व स्व.मिलींद प्रभाकर गाजरे रा.हिंगोणे यांच्या स्मरणार्थ सौ.माधवीताई विनीत चिरमाडे रा.कर्जत यांच्याकडून हिंगोना गावासाठी ” स्वर्गरथ देण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. ग्राम पंचायत कार्यालय समोर पार पडलेल्या लोकार्पण कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी स्वामी नारायण गुरुकुल चे अध्यक्ष शास्त्री भक्ती प्रकाश दास,शास्त्री भक्ती किशोर दास,डॉ. व्हि.जे.वारके,नरेंद्र नारखेडे,प्रा.व. पु.होले आदी.उपस्थित होते.मान्यवरांचा ग्राम पंचायत तर्फे शाल,श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवर संतांनी स्वर्ग रथाची चावी मनोज वायकोळे यांचे कडे सुपूर्द केली.यावेळी बोलताना शास्त्री भक्ती प्रकाशदास म्हणाले हिंगो ना गावाची स्मशान भूमी ही गावापासून खूप लांब आहे.याचा विचार केला तर स्वर्ग रथाची आवश्यकता भासली.आणि ते कार्य प्रा.होले यांच्या मार्गदर्शनाखाली चिरमाडे परिवाराने पूर्ण केले.ग्रामस्थांनी या स्वर्ग रथाची देखभाल करून उपयोगी आणावा.असे सांगितले.नारखेडे यांनीही विचार मांडले.स्वर्ग रथ तयार करणारे उद्योजक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष शामकांत पाटील,उपाध्यक्ष प्रवीण पाटील, प्रवीण वारके,ग्राम पंचायत सदस्य रवींद्र पाटील,राजेंद्र महाजन,मनोज वायकोळे,विष्णू महाजन,किशोर सावले,छगन गाजरे,भरत पाटील, युवराज बोरोले,विजय पाटील, आदी.उपस्थित होते.सूत्रसंचालन अशोक फालक,आभार सदानंद पाटील यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.