लोकलमधून पडल्याने २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

0

मुंबई : लोकलमधून पडल्याने एका २२  वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 च्या सुमारास घडली. चार्मी पासद असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.

देसलेपाडा-भोपर येथील रहिवासी चार्मी हिनं आज सकाळी साधारण नऊच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईच्या दिशेने जाणारी जलद ट्रेन पकडली. डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस प्रचंड गर्दी होती. ऑफिसला पोहोचायला उशीर होऊ नये आणि लेटमार्क लागू नये म्हणून तिनं गर्दीतही ट्रेन पकडली. गर्दीमुळं तिला कशीबशी दरवाजाजवळ उभं राहायला जागा मिळाली. तिनं आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. ट्रेन कोपरजवळ पोहोचली असता, गर्दीच्या रेट्यामुळं तिचा हात सुटला आणि ती ट्रेनमधून खाली पडली. यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here