लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने सुविधांना भडाग्नी

0

जळगाव, दि
शहरातील चारही स्मशानभूमीकडे लोकप्रतिनिधीचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्षाने मृतदेहांना भडाग्नी दिला जात आहे. स्मशानभूमीमधील प्राथमिक सुविधांकडे दुर्लक्ष होत असाने नातेवाईकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील चारही स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतेवेळी नागरिकांना सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करनही या सुविधांकडे दुर्लक्ष होत असून शेवटीची यात्राही खडतड होत आहे. महानगरपालिकेकडे स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तची जबाबदारी आहे. या ठिकाणी प्राथमिक प्राथमिक सुविधांची वाणवा मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे अंत्यसंस्कार करतेवेळी नागरिकांच्या तळ पायाची आग मस्तकी भिडत आहे. बहुतांश लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या अंत्यसंस्काराला उपस्थिती दे असताना देखील या महत्त्वपूर्ण विषयाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असून ते हेतुपुरस्कर लक्ष देत नसल्याची ओरड होत आहे.
नेरीनाका, मेहरुण, शिवाजी नगर व पिंप्राळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी लाकुड, पाणी या महत्त्वाच्या गोष्टी वेळेत उपलब्ध होत नसल्याने संतापात भर पडत आहे. उन्हाळा, पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासियांवर येत असून याकडे मनपाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष
स्मशानभूमीतील सुविधांची एैशीतैशी झाली असताना त्याकडे मनपा अधिकार्‍यांचे देखील लक्ष केंद्रीत होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या अनागोंदी कारभारामुळे मृतदेहांची विटंबना होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.