लोकनियुक्त नगराध्यक्षा व माजी आमदारांचा ई-रिक्षा ने प्रवास

0

अमळनेर(प्रतिनिधी) : राज्य सरकारने माझी वसुंधरा योजनेअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी पाऊले उचलायला सुरवात केलेली आहे.याचाच एक भाग म्हणून अमळनेर नगरपरीषदेतर्फे प्रत्येक सोमवारी नो-व्हेहिकल डे चे आवाहन नागरिकांना केले जाते,व तो दिवस यशस्वीपणे साजरा करण्यात येतो.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ई- रिक्षा ने प्रवास केला. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी व शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, नगरपरिषदेचे सन्माननीय नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.