Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लॉकरमधून परस्पर काढले दागिने; मुलगी व नातवानेच केली वृध्दाची फसवणूक
    गुन्हे वार्ता

    लॉकरमधून परस्पर काढले दागिने; मुलगी व नातवानेच केली वृध्दाची फसवणूक

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 14, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव  शहरातील मोहननगर येथे  रहिवासी असणार्‍या वृध्दाला त्यांची मुलगी आणि नातवाने फसवून त्यांच्या लॉकरमधील तब्बल ४३ लाख ७६ हजार रूपयांचे दागिने परस्पर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यादवराव सुपडू बाबरेकर हे मोहननगरातील रहिवासी आहेत. त्यांनी एका बँकेतील लॉकरमध्ये ९६ तोळे सोने आणि ८० तोळे चांदीचे दागिने ठेवले होते. अलीकडेच २ ऑगस्ट रोजी त्यांनी बँकेत जाऊन लॉकरमधील दागिन्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी बँक व्यवस्थापकाने त्यांना त्यांची मुलगी वैशाली वाणी यांना या लॉकरबाबत विचारणा करण्याची सूचना केली.

    यामुळे बाबरेकर यांनी आपल्या मुलीशी संपर्क साधला असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांना या प्रकरणी संशय आला. त्यानंतर त्यांनी वैशाली वाणी हिच्यासह औरंगाबाद येथील मुलगी उज्ज्वला व पुणे येथील लहान मुलीशी मोबाइलव्दारे संपर्क साधून जळगाव येथे बोलावले. त्यांनी या प्रकाराबाबत माहिती दिली. मोठी मुलगी ज्योती काथार (रा. नवी मुंबई) हिलाही बोलावले. सर्व कुटुंबीय एकत्र आल्यावर वैशालीला लॉकरमधील दागिन्यांबाबत विचारणा केली. लॉकरमधील दागिने घेतलेले आहेत. मात्र, ते तुम्हाला देणार नाही, असे वैशालीने सांगितले. लॉकरमधील दागिने घेतले असल्याचीही तिने कबुली दिली.

    तसेच  बँकेतील लॉकरमधील  दागिने हे आपली मुलगी वैशाली वाणी हिने नातू हरीश वाणी यांनी काढल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे यादवराव बाबरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगी वैशाली वाणी व नातू हरिष वाणी यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif