Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लॉकडाऊन मध्ये नाभिक समाजावर अन्याय
    जळगाव

    लॉकडाऊन मध्ये नाभिक समाजावर अन्याय

    By April 17, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (प्रतिनिधी) : कोरोनिचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र शासनाने इतर घटकाना मदत जाहीर करत नाभिक समाजाला आर्थिक मदत पासुन वंचित ठेवल्याने शहर व तालुक्यातील नाभिक बांधवानी शासना विषयी आपला संताप व्यक्त करत गिरणा नदी पात्रात सकाळी ९ वाजता मुंडन करत आदोलंन केले.

    महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेल्या लॉकडाऊन मध्ये सर्व प्रथम सलुन, पार्लर व्यवसाय बंद केला आहे. मागिल लॉकडाऊन वेळी देखील हीच स्थिती होती. लॉकडाऊनमुळे आपल्या समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब लॉकडाऊन जाहीर करताना नाभिक समाज बांधवाना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती. इतर व्यसायधारकांना मदत जाहीर करताना शासनाने नाभिक समाजाला मदत देण्यासाठी चकार शब्द देखिल काढला नाही. तसेच मागिल वर्षी देखील लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद असल्याने खचुन जात समाज बांधवानी आत्महत्या केल्या आहेत. यावर्षी देखील चोपडा तालुक्यातील वैजापुर येथे गणेश सैदाणे, उस्मनाबाद येथे मनोज झेडे यांनी आत्महत्या केले आहेत. त्याच्या वारसाना शासनाने मदत जाहीर केली नाही.

    लॉकडाऊन मुळे प्रभावीत इतर घटकाना शासन मदत देत असताना नाभिक समाजाला मदत न देणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. नाभिक समाजाने कीती कीती अन्याय सहन करायचा; या संतापाचा उद्रेक होऊन शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव यांनी मुंडन करुन शासनाकडे आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी नाभिक समाज बांधव यांनी आपले मुंडन करत केले. याच पध्दतीचे आंदोलनात भडगाव तालुक्यातील कजगाव, गोंडगाव आमडदे, गिरड, कोळगाव सह इतर गावातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टीगशन पाळत, मास्क, साॕनिस्टाझरचा वापर करत याप्रंसगी शासना विषयी संताप व्यक्त करण्यात आला.

    यावेळी नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, राजेद्र सोनवणे, प्रभाकर नेरपगारे, सुभाष ठाकरे, निलेश महाले, राजु महाले, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, नारायण नेरपगारे, दिलीप वेळीस, अरुण पवार, बापु महाले, नामदेव चव्हाण, अनिल नेरपगारे, नितिन शिरसाठ, विजय चव्हाण, दिपक शिरसाठ, सुर्यभान वाघ, संजय शिरसाठ, सुभाष चव्हाण, भगवान नेरपगारे, नाना चव्हाण, राजु शिरसाठ, नंदु ठाकरे, सागर मोरे, राजु सोनवणे, भिका शिरसाठ, भास्कर पवार, राम नेरपगारे सह सर्व समाज बाधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif