लॉकडाऊन काळात मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध पालिका पथकाची कारवाई

0

भुसावळ (प्रतिनिधी)–  कोविड १९ च्या संसर्ग रोखण्याकरीता  सर्वत्र लॉक डाऊन सुरुं असून कामे  बंद आहे .तरीही बांधकाम करणाऱ्या  एका विरुद्ध तसेच मास्क न लावता फिरणाऱ्यां विरुद्ध  पालिका पथकाने रवीवार १९ एप्रिल रोजी  कारवाई केली असून त्यांचे कडून  एकूण २० हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे .

येथील पांडुरंग टॉकीज पाठी मागिल भागात रविवार रोजी वीरेंद्र फिरके यांनी विनापरवानगी लॉक डाऊन मध्ये बांधकाम करीत असल्याचे पालिका पथकाचे निदर्शनास आल्याने वीरेंद्र फिरके यांचे विरुद्ध कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच रविवार रोजी भारत मेडिकल समोरिल परिसरात मास्क न लावणाऱ्यां विरुद्ध पालिकेने ५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून  दंड न भरणाऱ्यांना तोंडाला शर्ट बांधून उठाबश्या काढण्याची   शिक्षा करण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली पालिका अधिकारी संजय बानाइते , पंकज पन्हाळे, विजय तोषणीवाल, परवेज शेख , विशाल पाटिल , लोकेश ढाके , महेश चौधरीं  यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.