लॉकडाऊनमुळे त्रस्त पथविक्रेत्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून आधार द्या – आ.मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : लॉकडाऊनमुळे कष्टकरी पथविक्रेत्यांना रोजगार गमवावा लागला. त्यांना आधार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पथविक्रेत्यांना १० हजार रुपये पर्यंत कर्जस्वरूपात देण्यासाठी स्वनिधी योजना सुरू करण्यात आली. चाळीसगाव शहरात त्याचा प्रचार – प्रसार देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला मात्र उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक चाळीसगाव शहरातुन ५०० हुन अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र यातील एकही लाभार्थ्याला कर्ज न मिळाल्याने चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांच्या व्यवस्थापकांची व नगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या जनसेवा कार्यालयात बोलावली होती. त्यात योजना बारगळण्यात बँक व नगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभाव, पथविक्रेत्यांना असलेली योजनेची अपूर्ण माहिती अशी विविध कारणे समोर आली.

बँक व्यवस्थापक व नगरपालिका अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आमदार मंगेश चव्हाण यांनी जाणून घेतल्या. रस्त्यावर विविध वस्तू विक्री करून पोट भरणारा वर्ग हा आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक व जगताना स्वाभिमानी असतो. ते कर्ज घेतात आणि फेडतातही याउलट अनेक अरबोपती उद्योजक बँका बुडवून फारार झाल्याचे आपण बघितले आहे. १० हजार ही तुम्हा – आम्हासाठी छोटी रक्कम असेल पण सलग ३ महिने रोजगार गमावलेल्या पथविक्रेत्यांसाठी ती मोठी रक्कम आहे. जे अर्जदार आपल्या बँकेत नियमित व्यवहार करतात त्यांना आपण तात्काळ कर्ज मंजूर करावा, जे अर्जदार नवीन असतील त्यांची खात्री करून कर्ज द्यावे. मात्र सामान्य कष्टकरी यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. भावना व व्यवहार यांची सांगड घालून मानवतेच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत केले.

यावेळी चाळीसगाव शहरातील नामांकित चार्टर्ड अकौंटंट भूषण भोसले साहेब, शिवनेरी फौंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण, नगरपालिकेचे NULM अधिकारी किरण निकम व सोनाली मोगलाईकर, या योजनेची लीड बँक सेंट्रल बँकचे व्यवस्थापक अनुज कल्याणकर, महाराष्ट्र बँकेचे चेतन अवसरे यांच्यासह बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक कृषी व मुख्य शाखा, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, बँक ऑफ बडोदा आदींचे व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी बँक व्यवस्थापकांना स्वनिधी योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत देखील माहिती घेतली.

याशिवाय बँकांना काम करताना इतर काही अडचणी येत आहेत का? त्या सोडवण्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालेन अशी विचारपूस करून कोरोनाच्या काळात तुम्ही खरे कोरोना योद्धे म्हणून जनतेची सेवा केली. प्रसंगी कोरोना सारख्या आजाराने अनेक कर्मचारी बाधित झालेत त्यांच्या या जनसेवेचे देखील कौतुक आमदार चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.