मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकबोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधातया बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. “लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं रोखठोक मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.