लॉकडाउन हटवायचा की वाढवायचा? पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

0

नवी दिल्ली : राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या लॉकडाऊनचे नियम शिथील केले होते. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्सफरसिंगद्वारे संवाद साधणार आहे.  या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी हि 5 वी बैठक आहे. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

रेड, ग्रीन आणिऑरेंज झोनसंदर्भात करण्यात आलेल्या नियमांवर राज्यांनी आक्षेप घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यांचे म्हणणे आहे की, परप्रांतीय कामगारांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशाने बहुतेक जिल्हे रेड झोनमध्ये येतील.

देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सध्याचा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. तत्पूर्वी आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.