Monday, September 26, 2022

लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश पाटील यांचा अमृतयोग सोहळा संपन्न

- Advertisement -

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

लेवा समाजातील आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधी व इतर पदाधिकारी यांनी आता थांबले पाहिजे समाजाच्या इतर कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. लेवा समाजातील सर्वच प्रस्थापित राजकारण्यांनी आता नवोदितांना संधी द्यावी जेणेकरून नवीन चेहरे पुढे येतील असे मत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

लेवा समाजाचे आधारस्तंभ व ज्येष्ठ नेते व भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक मा.रमेशदादा विठू पाटील यांचा अमृतयोग सोहळ्याचे आयोजन लोकविद्यालय,पिळोदा रोड पाडळसे तालुका यावल येथे करण्यात आले होते.याप्रसंगी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना वरील प्रतिपादन केले आहे. त्याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे, आ.राजूमामा भोळे,आ.शिरीष चौधरी, जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा बँक चेअरमन सौ.रोहिणीताई खडसे- खेवलकर, विष्णू भंगाळे, दिलीप भोळे व अनेक लेवा समाज मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या ७५ व्या वर्षांत पदार्पणानिमित्त अमृतयोग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लेवा समाजातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे,खा.रक्षा खडसे, जिल्हा बँक चेअरमन ॲड.रोहिणी खडसे,आ.राजुमामा भोळे,आ.शिरीष चौधरी, जळगाव महापौर जयश्रीताई महाजन,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात सर्वच प्रमुख उपस्थितांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. डॉ.उल्हास पाटील यांनी लोकप्रतिनिधींना आता थांबण्याचा सल्ला देऊन नवोदितांना संधी द्यावी असे वक्तव्य केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या