लेखी आश्वासनानंतर नगरध्यक्षाचे उपोषण मागे

0

वरणगाव :- शहरातील भोगावती नदीचे पुर्वत वैभव येण्या साठी व नदीच्या पाण्यामुळे शेतातीत विहिरीचे स्तोत्र वाढण्या कामी हाती घेतलेले खोली करणाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेवीका उपोषणास बसले होते. मात्र मुख्यधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले.

उजली (ता बोदवड ) येथुन उगम असलेल्या शहरातुन वाहणारी भोगावती  नदीला  पुर्वी बारा माहे पाणी होते मात्र अलीकडेच्या काळात हि नदी कोरडी असुन ती पुर्वत होण्या करण्या साठी केंद्रीय मंत्री नितीन गाडकरी, जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कडे नदी खोली करणाची मागणी करीत पाठपुरवठा करून राष्ट्रीय महामार्गा वरील सात पुला जवळून खोली करण्याचे कामास सुरुवात केली मात्र खोली करण्याचे काम शहरात येताच काम पडले हे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यात यावे या मागणी साठी नगराध्यक्ष सुनिल काळे, उपनगराध्यक्ष शे अखला क शे युसुफ नगरसेवीका मेहेजाबी पिंजारी, माला मेढे, शशी कोलते यांच्या सह शहरातील नागरीक भवानी माता मंदिराच्या पायथ्याशी सकाळी उपोषणास सुरुवात करण्यात आली होती मात्र दुपारी मुख्यधिकारी (नगर परिषद) बबन तडवी यांनी नदी खोली करणाचे काम येत्या १५ मे पासुन कामास सुरुवात कारण्यात येणार असल्याचे लेखी अश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली

यावेळी महसुल विभागाच्या योगीता पाटील, उप पोलीस निरिक्षक सारिका कोडापे सजिव कोलते, मिलीद मेढे, अल्लाउद्दीन शेठ, राजु गुरचळ शे सईद शे भिकारी यांच्यासह नागरिक उपस्थीत होते

Leave A Reply

Your email address will not be published.