Wednesday, May 18, 2022

लेकीचे अनोखे प्रेम; लग्नात वडिलांचा पुतळा बनवून घेतला आशीर्वाद

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

“पापा की लाडली बेटिया” असे म्हटले जाते व मुलीही वडिलांवर खूप प्रेम करतात. बाप आणि लेकीचं प्रेम खूप अनोखं असत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होत्याच नव्हते होऊन अनेक कुटुंबांचा घरचा कर्ता पुरुष गेल्याने उध्वस्त झाले आहेत. अशाच प्रकारे तालुक्यातील नांद्रा येथे ही अनेक चांगले व्यक्तिमत्त्व अचानक हरपले. त्यामध्ये नांद्रा येथील चार मुलींचे एकटे खंबीर आधारस्तंभ असणारे (मुलगा नाही) सदाचारी व नेहमी हसतमुख व्यक्तिमत्त्व माजी सैनिक भागवत पाटील यांचे अनपेक्षित कोरोनात निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या चार मुलींपैकी दोनच मुलींचे लग्न झालेले आहे. व दोन मुलींचे लग्न बाकी असतांना त्या कुटूंबावर मोठा आघात झाला. या कुटूंबावर नियतीने क्रूर असा अन्याय केला. त्यावेळेस त्यांचे दोन्ही जवायांपैकी एक जावाई आर्मीत व एक जावाई  इंजिनिअर  आहेत. त्यांनी घरातील मुलांची जबाबदारी पेलून त्या कुटूंबाला कसेतरी सावरले.

कै. भागवत (फौजी) यांच्या तिसऱ्या मुलीचे लग्न, पप्पांना मोठ्या थाटामाटात करायचे होते. पण ते स्वप्न उराशीच घेऊन ते अचानक या कुटूंबातून निघून गेल्याने त्यांची स्मृती कायम मुलींना आपल्या घरात राहावी व पप्पा आपल्यातच असल्याची जाणिव व्हावी म्हणून त्यांचा मोठा सिल्व्हर चेअर वरचा  सुमारे दोन लाख किंमतीचा पुतळा बनवून लग्नात त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेत पाणावलेल्या पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण करुन पप्पा त्यांच्या सोबतच असल्याची जाणिव करुन घेतली.

याप्रसंगी आलेले सर्व नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळींचे डोळेही पाणावले. खरंच पप्पाच्या लाडल्या मुलीचं असतात व मुलींचे पप्पांवरचे हे सर्व प्रेम पाहून सर्वांना गहिवरुन आले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या