लिफ्ट कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

0

इंदूरः बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची तात्पुरती उभारलेली लिफ्ट कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील महू येथे घडली. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये व्यापारी पुनीत अग्रवाल, (वय ५३), मुलगी पलक (वय २७), जावाई कल्पेश (वय २८), नातू नव अग्रवाल आणि दोन मुले आर्यवीर व गौरव यांचा यात समावेश आहे. दरम्यान, जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मंगळवारी इंदूरहून केवळ २५ किलोमीटर अंतर लांब असलेल्या महू येथील एका फार्महाऊसची लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी विनोद शर्मा यांनी दिली. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.