पारोळा (प्रतिनिधी) : निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊन करून व्यापार्यांची फसगत करण्यात आली असुन या लाॅकडाऊन विरोधा संपुर्ण राज्य भर निर्देंशने व निवेदने देण्यात येत आहेत. पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने ही आज पारोळा तहसिलदार ,पोलिस स्टेशन,व पारोळा नगर पालिके ला लाॅकडाऊन विरोधात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात ब्रेक द चैन या गोंडस नावा खाली आगोदर विकेंड लाॅकडाऊन सांगुन नंतर मात्र काही बाबी सुरू तर काही बंद म्हणुन संपुर्ण लाॅकडाऊन करण्यात आला, शासनाने व्यापार्यांची फसगत केल्याचे म्हटले आहे, म्हणुन आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीने या निर्णयाचा निषेध करतो,तसेच अत्यआवश्यक सेवा सुरू मात्र इतर दुकाने बंद मग इतर व्यापार्यांनी बॅके चे हप्ते लाईट बिल कामगाराचे पगार कसे द्यायचे आत्यवश्यक मध्ये उत्पादन सुरू मात्र विक्री बंद, बांधकाम सुरू मात्र बिल्डींग मटेरियल दुकाने बंद,लग्नाला परवानगी मात्र कापड भांडे फुट वेअर बंद असा टाकणार अध्यादेश देण्यात आला.
आता कुढे व्यापारी मागच्या लाॅकडाऊन मधुन सावरत आहे व पुन्हा लाॅकडाऊन हा व्यापार्यंना न परवडणारा आहे,व्यापार्यां बरोबर कामगारा वर ही उपास मारीची वेळे आलेली असुन शासनाने हा लाॅकडाऊन त्वरित मागे घ्याव व व्यापारी व कामगाराना न्याय द्यावा अन्यथा आम्ही व्यापारी व कामगार कुंटुबा सोबत आमरण उपोषण करू कोरोनाने नंतर परंतु भुकेनेच आम्ही मरू अशी हार्त हाक शासनाला दिली आहे,तरी शासनाने याचा गांभिर्याने विचार करून व्यापार्याना न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे, निवेदनावर शहरातील कापड व्यापारी असोशिएशन,सराफ असोशिएशन,भांडे व्यापारी संघटना,फुट वेअर संघटना,कटलेरी संघटना,इलेक्ट्रानिक्स असोएशिन, पारोळा नाभिक संघ,तसेच इतर संघटनेच्या पधादीकार्याच्या स्वक्षर्या आहेत,या वेळी पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रीय,उपाध्यक्ष अशोक लालवाणी,सचिव,संजय कासार,महेश हिंदुजा,रोशन शहा,धर्मेंद्र हिंदुजा,गोपाल दाणेज,प्रतिक मराठे,तसेच इतर पधादिकारी नाभिक समाजा चे पदाधिकारी व इतर व्यापारी संघटनेचे पधादिकारी उपस्थित होते.