लाॅकडाउन संपत संपत लोकांना कोरोनाची आठवण पडत चालली आहे?

0

पारोळा | प्रतिनिधी
जसे जसे लाॅकडाउन चे दिवस संपत आहेत तसे तसे नागरिकाच्या मनातील कोरोना वायरस ची भीती ही काही शी नाहीशी होताना दिसत आहे, याचेचे उदाहरण म्हणजे च सध्या सर्व बॅंका मधील जनधन चे पैसे काढण्यासाठी व रेशन दुकानातून रेशनिंग चे माल घेण्यासाठी दुकानान जवळील वाढती गर्दी व कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स न पाडता व माॅक्स न वापरता सर्वच ठिकाणी अगदी निर्धास्त पणे गर्दीच गर्दी दिसुन येत आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रात या कोरोना वायरस चे वा़ढते प्रादुर्भाव पाहूनच प्रशासनासह पोलीसांन वरिल ताण दिवसेंदिवस वाढत आहे ,तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची सरसाधने उघडी नाहीत तरीही सर्व संसारोपयोगी वस्तू सर्वांना बिनदिक्कत मिळत असल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारचे फरक पडलेला दिसत नाही, अनेक जण विनाकारण मोटारसायकलीं वर फिरताना दिसत आहेत, म्हणून या विनाकारण फिरणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने थेट कारवाई चे सत्र हाती घेतले आहे, याचाच भाग म्हणून पारोळा येथे दि, ९ रोजी २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, यात ज्यांना खरोखरच काही तरी आवश्यक आहे त्यांनाही या मुळे फटका बसत आहे, ज्यांना कोणतेही काम नाही असे बरेच ग्रामीण भागातील लोक फक्त शहराच्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडत आहेत, प्रशासन वेळोवेळी आवाहन करित आहे की घरी थांबा व सुरक्षित राहा पंरतु काही लोकांना या संसर्गजन्य कोरोना वायरस चे गांभिर्य कळत न असल्याचे दिसून येत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.