लासुर येथे मोफत तांदूळ वाटपास सुरुवात

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-जगभर कोरोना रोगाने थैमान माजवले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.सर्व कामधंदे बंद असून लोकांकडे काहीही उत्पन्नाचे साधन नाही. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लासुर गावात स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८४ येथे लाभार्थ्यांचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस ५ किलो याप्रमाणे मोफत तांदूळ वाटप करण्यात आला.

यावेळी सरपंच जनाबाई माळी,तलाठी दिलीप तडवी,ग्रा.वि.अधिकारी विश्वनाथ चौधरी,स्वस्त धान्य दुकानदार दिलीप पालीवाल यांचा हस्ते लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करत करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा.पं सदस्य वासुदेव महाजन,राजेंद्र बिडकर,पत्रकार आत्माराम पाटील,कोतवाल सिराज तडवी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.