लासुर येथे डी.पी चा इलेक्ट्रिक शॉक लागून २ म्हशी जागीच ठार

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे काल दुपारी गायी म्हशी चारून घरी येत असतांना गणपूर रस्त्यावरील डी. पी चा जोरदार इलेक्ट्रिक शॉक लागून २ म्हशी दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गावातील पंपनगर भागातील रहिवासी भिमा कान्हा चारण (वय २८) काल दुपारी गायी म्हशी चारून आल्यानंतर त्यांना हातेड रोडवरील खोकर तलावजवळील हौदावर पाणी पाजण्यासाठी नेत असतांना गणपूर रस्त्यावरील कोपऱ्यावरील डी. पी चा जोरदार इलेक्ट्रिक शॉक लागून ६५००० रुपये किंमतीची  भुरा जातीची सहा महिने गाभण असलेली म्हैस तसेच ६०००० रुपये किंमतीची भुरा जातीची ४ महिने गाभण असलेली म्हैस जागीच मरण पावल्याची घटना घडली.

सदर घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे करण्यात आली. पंचनामा पो.हे.काँ.संजय येदे यांनी केला असून पुढील कार्यवाही ना.पो.काँ.विकास सोनवणे करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.