लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे काल दुपारी 4 चा सुमारास विजेचा शॉक लागून शेतमजूर आणि बैल यांचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की मामावली वाट(रस्ता) मधील डाबक्या नाल्यात दि.१६ जून रोजी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेचे तार तुटून जमिनीवर पडले होते त्यात विद्युत प्रवाह सुरू असल्याची कल्पना नसल्याने शेतमजुराने त्यावरून बैलगाडी ओलांडण्याचा प्रयत्न केला व बैलाचे पाय अडकून विद्युत प्रवाहामुळे त्याला जोरदार शॉक लागला त्याला काढण्याचा प्रयत्नात शेतमजुरालाही विजेचा धक्का बसून शेत मजुराचा तसेच बैलाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
मयत शेतमजूर नामे विजय विलास बारेला (वय 22) लासुर गावातील पंपनगर परिसरातील रहिवासी आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि मनोज पवार,पो.हे.कॉ राजू महाजन,पो.ना रितेश चौधरी,पो.कॉ सुनील कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच सदर घटनेचा पंचनामा पो.हे.कॉ राजू महाजन यांनी केला.