लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-कोरोना रोगाचा वाढत्या प्रादुर्भावामूळे हातावर पोट भरणाऱ्या ग्रामस्थांचे आर्थिक जनजीवन विस्कळित झाले आहे याचं पार्श्वभूमीवर लासुर येथील मूळचे रहिवासी सध्या शिरपूर येथील रहिवासी इंदरचंद देवीचंद जैन यांच्यावतीने कै. देवीचंद प्रेमराज जैन यांचा स्मरणार्थ लासुर गावातील 50 गरजू कुटुंबियांना एकावेळचे जेवणाचे डब्बे दिले जात आहेत.
ते सध्या शिरपूर येथे स्थायिक असल्याने गरजू व्यक्तींना डब्बे बनवण्यासाठी स्वयंपाक कोणताही मोबदला न घेता मुरलीधर बाबुराव सोनवणे तसेच दिपक आनंदा सोनवणे यांच्याकडून केला जात आहे.त्यांना याकामी अजय पालीवाल,किशोर माळी, देवीलाल बाविस्कर,ए.के गंभीर सर यांचे सहकार्य लाभत आहे.