लासुर परिसरात वरूणराजाचे जोरदार आगमन

0

लासुर, ता.चोपड़ा(वार्ताहर) :- लासुर गावासह परिसरात विजेच्या कड़कड़ाट जोरदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दड़ी मारल्याने शेतातील पीके कोमजून गेली होती. परिसरात सर्वदूर कापूस,मका,मुग ,उडिद,तुर लागवड पूर्ण झाली होती. परंतु पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.आंतरमशागत करून शेतकरी पाऊस येण्याची वाट पाहत होता. त्यातच त्यातच आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांनां नवसंजीवनी मिळाली आहे.निंदणी व आंतर मशागतीच्या कामांनी वेग धरला आहे.त्यात खतांच्या मात्रा देण्याच्या कामांना शेतकरी विशेषत्वाने प्रधानक्रम देणार असून लगबग सुरू होईल. कोमजलेल्या शेतातील पिकाना दिलासा मिळाला असून शेती कामाची लगबग पुन्हा सुरु होणार आहे.

तद्वतचं शेतकरी आता पावसाळी कांदा लागवडीसाठी कांद्याचे बी टाकत आहे.कांदयाचे बी टाकून रोपांची चांगली उगवण व्हावी म्हणून शेतकरी कसोशीने प्रयतशील असतो. एकंदरीत बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात कामाच्या लगबगीने वेग धरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.