लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची मोहिम राबवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांना थर्मल स्कॅनर तसेच डिजीटल ऑक्सीमीटर सरपंच जनाबाई माळी व उपसरपंच अनिल वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
गावातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांनी महत्वाची भुमिका बजावली असुन महाराष्ट्र शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी योजनेचा यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविका तसेच अंगणवाडी सेविका यांनी सुव्यवस्थित सर्वेक्षण करावे तसेच ग्रामस्थांनी त्यांना आरोग्यविषयक योग्य माहिती द्यावी असे आवाहन यावेळी सरपंच जनाबाई माळी यांनी केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी विश्वनाथ चौधरी,वैद्यकीय अधिकारी डाॅ दिनेश निळे,ग्रा.पं.सदस्य सुरेश माळी तसेच राजेंद्र बिडकर,शिवाजी पाटील,कल्याण पाटील,हिंमतराव माळी,कुदन बोरसे,किशोर माळी यांसह आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका उपस्थित होते.