लासूर ता.चोपडा(वार्ताहर)-येथे आतापर्यंत १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ९ रुग्ण उपचारा अंती बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.लासूर गावात आजवर ५२ संशयितांचे अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी १२ रुग्णांचे अहवाल पोजिटीव्ह तर ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले.गावातील विविध 4 परिसरामध्ये आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये ७ महिला,३ पुरुष,२ लहान बालके यांचा समावेश असून सद्यस्थितीला ९ जणांनी कोरोनावर मात केली असून ३ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांनी दिली.
आतापर्यंत आढळलेले सर्व कोरोनाबाधित रुग्णांना इतर गावांपासून कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने ग्रामस्थांनी घरीच थांबावे असे आवाहन ग्रामपंचायत लासुर तसेच प्रा.आ.केंद्र लासुर यांचावतीने करण्यात आले आहे.
