वरखेडी, ता.पाचोरा (वार्ताहार) : गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावर सेवक सेवाभावी संस्था जळगांव यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार लासुरे येथील पोलीस पाटील श्री संजय धोंडू बारी यांना जाहीर करण्यात आला.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोरोना योध्द्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार देण्याचे सेवक सेवाभावी संस्था अध्यक्ष विशाल शर्मा तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी संजय बारी यांचे सेवाभावी कार्य पाहून निश्चित केले.राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.