लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दीप सिद्धूला अटक

0

नवी दिल्ली –  २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान घडलेल्या हिंसाचाराबद्दल गुन्हे दाखल झालेल्या शेतकरी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी लुकआऊट नोटिसा जारी केल्या.  लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

 

या  हिंसाचारासाठी जबाबदार धरले जात असलेल्या दीप सिद्धूचा काही दिवसांपासून दिल्ली पोलीस शोध घेत होती. यातच एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूला अटक करण्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आलं आहे.

 

दरम्यान,  गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला,  शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप पंजाबी अभिनेता दीप सिद्धू जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी केला आहे.

 

यानंतर दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार होते. या सर्वांच्या अटकेसाठी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं होतं. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस मिळेल असं म्हटलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.