लातूर जिल्ह्यात भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील पाच ठार

0

लातूर :- लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री टेम्पो आणि लग्नाहून परतणाऱ्या टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी आहेत.

सुदैवाने या अपघातातून एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही चिमुकली मॅजिकमधून बाहेर फेकली गेल्याने बचावली आहे. या अपघातातील जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सोनकांबळे परिवार विळेगाव ता. अहमदपूर येथून लग्न आटोपून गावाकडे येत असताना जांबकडून शिरुर ताजबंदकडे जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जीपमधील पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मृतांमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (40), अरविंद सोनकांबळे (30), पुष्पा सोनकांबळे (45), कांताबाई सोनकांबळे (55), छकुली सोनकांबळे (6) यांचा समावेश आहे तर आरुशी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनिता सोनकांबळे, रितेष सोनकांबळे, प्राचीन सोनकांबळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.