लाखनवाडा येथे 30 एप्रिलला काॅंग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

0

 खामगांव(प्रतिनिधी) सध्या राज्यातील रक्तपेढयामध्ये असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्षनाखाली खामगांव मतदार संघातील काॅंग्रेसजणांच्या वतीने महारक्तदान शिबीर आयोजित करुन 500 बाॅटल रक्तदान करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.दि.14 एप्रिल ते 1 मे मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा वाढदिवस या  पंधरवाडयापर्यंत हे  महारक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले असुन सहाव्या टप्प्यात शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी लाखनवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

लाखनवाडा येथील पेरीयार हाॅस्पीटल येथे सकाळी 10 वाजता होणाया या रक्तदान शिबीराकरीता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,खामगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार, माजी जि.प.सदस्य श्रीकुष्ण धोटे, पं.स.चे माजी उपसभापती चैतन्य पाटील,माजी पं.स.सदस्य सज्जादउल्ला खाॅं,लाखनवाडाचे सरपंच शेख अफरोज, उपसरपंच प्रकाश इंगळे, शिवाजीराव पांढरे, संताराम तायडे,अॅड.शहजाद उल्ला खाॅं यांच्यासह लाखनवाडा येथील ग्राम पंचायत सदस्य, काॅंग्रेसचे आजी-माजी नेते,पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.

तरी आयोजित या रक्तदान शिबीराकरीता जास्तीत जास्त युवक व काॅंग्रेसजणांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे   असे आवाहन तालुकाध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.