लस न घेणारे इंदुरीकर महाराज सांगताय ‘लसवंत व्हा’

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात.  लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले होते. ‘मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही’, असं वक्तव्य त्यांनी कीर्तन सांगताना केलं होतं. त्यामुळे त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल होऊन त्यांच्या वक्तव्यांवर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं होतं.

तर आता इंदुरीकर महाराज लसीकरणासाठी प्रबोधन करणार आहेत. राज्य सरकार लसीकरण मोहिमेसाठी इंदुरीकर महाराजांची मदत घेणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी इंदुरीकरांशी फोनवर चर्चा केली आहे.

त्यामुळे आता लस न घेणारे इंदुरीकर महाराजच लसीकरणासाठी प्रबोधन करणार आहेत. ग्रामीण भागात लसीकरणासाठी इंदुरीकर महाराजांची किर्तनातून हाक देणार आहेत. राज्यभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: हिरारिने प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here