Tuesday, September 27, 2022

लसीकरण केंद्र वाढवून लसीकरणाचा वेग वाढवा- अमोल पाटील

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पारोळा शहरासह तालुक्यासाठी लसीकरण केंद्र वाढवून लसीकरणाचा  वेग वाढवा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी प्रशासकीय  अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर मागणी केली.

- Advertisement -

- Advertisement -

आज पारोळा येथील तहसिल कार्यालय येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांच्या उपस्थितीत पारोळा तालुक्यात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत उद्भवणाऱ्या समस्या व नागरीकांची होत असलेली गैरसोय याबाबत बैठक बोलावण्यात आली.

यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, गटविकासअधिकारी विजय लोंढे, पारोळा नगर पालिका मुख्याधिकारी ज्योती भगत, पारोळा पोलिस स्टेशनचे प्रतिनिधी सहाय्यक पो. नि. निलेश गायकवाड यांचेशी चर्चा केली. यावेळी स्टाफ उपलब्ध होत नसले बाबत सुर्यवंशी यांनी सांगितले. त्यावर अमोल पाटील यांनी मध्यस्ती करत पारोळा तालुका डाॕक्टर असोसिएशन व नगर परिषदेच्या सहकार्याने स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला.

तसेच लसीकरण केंद्र वाढवण्यासंदर्भात कृषि उत्पन्न बाजार समिती सहकार्य करणार असुन बाजार समितीच्या आवारात लसीकरण केंद्र सुरू करा व नागरीकांची गैरसोय तातडीने दुर करा अशा  सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना  केल्या. यावर सुरू आहे त्याच ठिकाणी अधिकचे कर्मचारी नेमून लसीकरणाची गती वाढवण्यात येईल व आवश्यक तेव्हा बाजार समिती आवारात लसिकरण केंद्र सुरू करण्यात येईल यावर सर्वांचे एकमत झाले. तर पुढील काही दिवसात सदर लसीकरणाची गती वाढेल असे शेवटी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी दैनिक लोकशाहीशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या