सांगली: एका चित्रपटाची सांगलीच्या आळसंद गावातील अण्णा म्हणून ओरडणाऱ्या कोंबड्याला ऑफर आली असून कर्नाटकमधील एका दिग्दर्शकाने ही ऑफर कोंबड्याच्या मालकाला दिली आहे.
त्याचबरोबर या कोंबड्यावर बीडमधील काही लोक शॉर्ट फिल्म करणार असल्यामुळे एका वृत्तवाहिनीने दाखवलेल्या बातमीनंतर, राज्यभर प्रकाशझोतात आलेला हा कोंबडा आता लवकरच चित्रपटात पाहायला मिळणार आहे. खानापूर तालुक्यातील आळसंद गावातील ‘अण्णा’ म्हणून ओरडणारा कोंबडा लाखो लोकांनी पाहिला.
सोशल मीडियावर या कोंबड्याच्या बातमीवरुन जोक्स देखील सुरू झाले. पण आता कर्नाटकमधील एका दिग्दर्शकांने कोंबड्याच्या मालकाला चित्रपटाची ऑफर दिली आहे. याशिवाय बीडमधील काही लोक या कोंबड्यावर शॉर्ट फिल्म करणार आहेत. आळसंद गावात येऊन ही सगळी मंडळी त्या अण्णांची भेटदेखील घेऊन गेले आहेत. अण्णांनी कोंबडा विकण्यास नकार देत चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे.