Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी झाल्टे परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी झाल्टे परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील नागसेन नगर भागातील रहिवासी झाल्टे परिवारातील चौघांनी अश्लिल शिवीगाळ, मारहाण यासह लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली रोहीदास झाल्टे, सिंधुबाई रोहीदास झाल्टे, मुकेश रोहीदास झाल्टे व रोहीदास झाल्टे अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा जणांची नावे आहेत.

    शहरातील  एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या नागसेन नगर भागात मोलमजुरी करणारी महिला तिच्या दोघा मुलांसह राहते. या महिलेच्या घराच्या परिसरात वैशाली रोहिदास झाल्टे, सिंधुबाई रोहिदास झाल्टे, रोहिदास झाल्टे व मुकेश झाल्टे असे राहतात. 4 ऑगस्ट रोजी दुपारी सदर महिला मोलमजुरी करुन घरी परत आली. त्यावेळी तिच्या मुलाला झाल्टे परिवारातील चौघे जण मारहाण करत असल्याचे दिसून आले.

    आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे बघून सदर महिला भांडण सोडवण्यास व आपल्या मुलाचा बचाव करण्यासाठी गेली. त्यावेळी रोहीदास झाल्टे व मुकेश रोहीदास झाल्टे यांनी सदर महिलेच्या वस्त्राला हात लावल्याचा फिर्यादी महिलेचा आरोप आहे. तसेच वैशाली झाल्टे व सिंधु झाल्टे यांनी सदर फिर्यादी महिलेस खालच्या दर्जाची शिवीगाळ केल्याचा देखील आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या भांडणा दरम्यान चौघांनी महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केल्याचे म्हटले आहे

    दरम्यान गल्लीतील लोकांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडेफार यश आले. या घटनेप्रकरणी मुकेश रोहीदास झाल्टे, रोहीदास झाल्टे, वैशाली रोहीदास झाल्टे, सिंधुबाई रोहीदास झाल्टे या चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif