चोपडा;- शहरातील माहेर असलेल्या विवाहितेला आई-वडिलांकडून लग्नाला झालेला दोन लाख रुपयांचा खर्च घेऊन ये यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की धुळे येथील नवल नगर मोहाडी येथे सासर असलेल्या संगीता राजेंद्र चौधरी वय 36 यांचा विवाह राजेंद्र विठ्ठल चौधरी यांच्याशी झाला होता.
लग्नासाठी झालेला दोन लाख रुपयांचा खर्च आई-वडिलांकडून घेऊन येण्याच्या मागणीसाठी ८ मे 2004 ते 21 जुलै 2022 या कालावधीमध्ये संशयित पती राजेंद्र विठ्ठल चौधरी, सासू सुमनबाई विठ्ठल चौधरी, जेट नारायण विठ्ठल चौधरी, ननंद सुनिता अशोक चौधरी, नंदोई अशोक यशवंत चौधरी, भाचा सुमित अशोक चौधरी ,भाची सौ कांचन विक्की शेलार ,नंदोई सुनील रत्नाकर महाले ,ननंद मनीषा सुनील महाले, यांनी तुझ्या माहेरून लग्नाला झालेला दोन लाख रुपयांचा खर्च घेऊन ये अशी मागणी करून वेळोवेळी त्रास दिल्याने योगिता चौधरी यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक किरण गाडी लोहार करीत आहे.