भुसावळ :- येथील मोहित नगर भागातील एका घराला आग लागल्याची घटना घडली परिसरातील जागरूक युवकांनी प्रसंगावधान राखून त्वरित पुढाकार घेऊन एमएसइबी ला कळविले व वीजपुरवठा खंडित केला तसेच जीवाची पर्वा न करता पाणी टाकून यामुळे सुदैवाने फार मोठा अनर्थ टळला.
तहसील कार्यालयातील कर्मचारी इंद्रायणी देविदास सोनवणे यांचा मुलगा पंकज याचा विवाह दिनांक 17 मे रोजी रावेर तालुक्यातील तांडवे येथे होता यामुळे ही सर्व मंडळी घराला कुलूप लावून वरात घेऊन गेली होती. दरम्यान दुपारी 1वाजता अचानक जोराच्या हवेमुळे एमएसई बीच्या विज वाहिनी तारा लोंबकळत होत्या त्याचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाल्याने लग्नाकरिता अंगणात लावलेल्या मांडवाने पेट घेतला हा हा म्हणता आग रौद्ररूप धारण करीत होती तेवढ्यात परिसरातील युवक आकाश लोणारी , छोटू तडवी , सचिन अहिरे, संतोष इंगळे , कुमार नारखेडे , नानु वाणी , दिपक भालेराव या प्रसांगवधान राखून एमएसइबीला त्वरित कळविले व वीज पुरवठा खंडित केला . व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून पाणी टाकून आग आटोक्यात आणली .यामुळे कोणताही अनुचित प्रकार येथे घडला नाही व पुढील अनर्थ टळला .या आगीत मंडप , खुर्च्या, यासह सोफासेट, दुचाकी सायकल , बेचिराख झाले तसेच अंगणातील पक्षांच्या पिंजऱ्यातील सात ते आठ लव्ह बर्ड पक्षी होरपळून मृत पावले .
.दरम्यान विवाह स्थळी सोनवणे यांना घटनेचे वृत्त कळताच काही मंडळींनी विवाह सोहळा सोडून भुसावळ येथे घराकडे धाव घेतली . यामध्ये लग्न मंडपवाल्यासह शेजारील गणेश नंदलाल बिलसरे व यांच्या पाण्याची टाकी , गादी व पाईप आदी वस्तू जळून बेचिराख झाल्याने सुमारे 70 ते 80 हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे . याआगीबाबत पोलिसात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नाही .