लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार करणाऱ्यास 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

0

अमळनेर | प्रतिनिधी
येतील राहत असलेल्या एका अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर  बलात्कार करणाऱ्यास चहार्डी येथील तरुणास अमळनेरच्या जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
चहार्डी येथील पिंजारी वाड्यातून सतीश दिलीप चौधरी वय 27 याने 20 डिसेंबर 15 रोजी रात्री 8 वाजता एक अल्पवयीन मुलीला इशारे करून बोलवले व तुझ्याशी लग्न करेल आपण दोघे पळून जाऊ असे सांगून तिला घेऊन गेला . 21 रोजी मुलीच्या आईने चोपडा पोलीस स्टेशनला सतीश विरुद्ध फूस लावून पळवून नेल्याप्रकर्णी भादवी 363 व 366 अ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोमवंशी यांनी केला . सतीशने ने त्या पीडित मुलीला औरंगाबाद येथील रांजणगाव एम आय डी सी मध्ये खोली करून ठेवले आणि वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यावेळी त्याने तिला लग्नास वयाची अडचण येत आहे , तोपर्यंत आपण तेथेच राहू असे सांगितले . 10 मार्च 16 रोजी पोलिसांना दोघे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली होती . त्यानुसार पोलिसांनी मुलीला आणून तिची वैद्यकीय तपासणी करून तिचे जबजाबाब घेतले असता तिने आपल्या आईला सतीश ने कसा अत्याचार केला हे कथन केले पोलिसांनी सतीश विरुद्ध पुरवणी जबाबवरून भादवी 376 (2)प्रमाणे बलात्कार , बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 (ल) व 8 प्रमाणे गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती व तो जामिनावर सुटला होता हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील ऍड शशिकांत पाटील यांनी एकूण 13 साक्षीदार तपासले. त्यात प्रामुख्याने पीडित मुलगी , तिची आई , महिला पोलीस प्रमिला पवार , पोलीस उप निरीक्षक रोहिदास सोमवंशी , चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ गुरुदास वाघ यांची साक्षी महत्वाची ठरली न्या विक्रम आव्हाड यांनी आरोपीला 376 (2) मध्ये व पोस्को कायद्यांतर्गत 10 वर्षाची सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा तसेच अपहरण प्रकरणी 3 वर्षे शिक्षा व 3 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा सुनावली पोलिसांनी आरोपी सतीश यास ताब्यात घेऊन जिल्हाकरगृहात रवाना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.