Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»लग्नसमारंभासाठी पन्नास व्यक्तींना परवानगी विना वातानुकुलित मंगल कार्यालयांनाही परवानगी
    महाराष्ट्र

    लग्नसमारंभासाठी पन्नास व्यक्तींना परवानगी विना वातानुकुलित मंगल कार्यालयांनाही परवानगी

    By March 27, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेनुसार लग्नसमारंभाला घालण्यात आलेली 25 लोकांची मर्यादा वाढवून 50वर करण्यात आली आहे. त्यामुळे  वर-वधू ,नातेवाईक, भटजी, आचारी, वाजंत्री सर्व मिळून 50 व्यक्तीना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येईल. त्याशिवाय नाॅन एसी मंगल कार्यालय सभागृहामध्ये सुध्दा लग्न समारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे .

    जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तसा आदेश 26 मार्च रोजी दिला आहे. त्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत लग्न समारंभ आयोजित करता येईल. लग्न समारंभ वर किंवा वधूचे घरी त्याचप्रमाणे खुले लॉन, मंगल कार्यालय ,सभागृहात करता येईल मात्र एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ 50 व्यक्ती उपस्थित राहतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्न स्थळिच वाद्य वाजविण्याची मुभा आहे. त्याच प्रमाणे त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर मास्क, सॅनिटायजरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे.

    कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे .त्याचप्रमाणे वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित व्यक्तींच्या यादी सादर करुन लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी. असे स्पष्ट निर्देश जिल्हा दंडाधिकारी श्री शैलेश नवाल यांनी दिले आहेत .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif