बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते रवी बाविस्कर यांना विश्वास
सुनील बोदडे बोदवड
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात भाजपा – सेना महायुतीच्या उमेदवार रोहिणी खडसे- खेवलकर या 50 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजयी होतील असा विश्वास येथील सामाजिक कार्यकर्ते रवि बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण बोदवड तालुक्यातील जनता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी उभी आहे. बोदवड तालुक्यातील निर्मिती नाथाभाऊंमुळेच झाली. बोदवड नगरपंचायतसह, तालुकास्तरावरील कार्यालये नाथाभाऊंच्याच पुढाकाराने झाली आहेत. बोदवड नगरपंचायत, बोदवड पंचायत समितीवर भाजपचीच सत्ता आहे. विशेष म्हणजे बोदवडला न्यायालयाची निर्मिती नाथाभाऊंमुळेच झाली त्यामुळे बोदवडची जनता नाथाभाऊंच्या वर विशेष प्रेम करतात त्याचा फायदा रोहिणी खडसेंना होणार असल्याचे रवि बाविस्कर यांचे म्हणणे आहे.
बोदवडला पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या पाण्याची आतापर्यंत जटील समस्या होती. परंतु बोदवड परिसर उपसा सिंचन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता येत्या उन्हाळ्यात त्यातूनच बोदवडकरांना पिण्याचे पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचे शिल्पकार एकनाथराव खडसे हेच आहेत. बोदवड तालुक्याच्या विकास कामात नाथाभाऊंचा पुढाकार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विविध समाजा- समाजात सलोखा नाथाभाऊंनी निर्माण केला असल्याने सर्व समाज गुण्या गोविंदाने राहतात. बोदवड तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यात नाथाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. व्यापारी वर्ग तसेच शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यात नाथाभाऊ अग्रेसर आहेत. त्यामुळे नाथाभाऊंवर प्रेम करणारी सर्व जनता
नाथाभाऊंची कन्या रोहिणीताईंवर विशेष प्रेम करतात. रोहिणीताईंना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाचा अनुभव आहे. मुक्ताई साखर कारखान्याच्या त्या व्हा. चेअरमन आहेत. सूतगिरणीच्या त्या संचालक असल्याने सहकाराचा त्यांचा अनुभव मतदार संघासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे नाथाभाऊ बोदवड तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार असल्याने विरोधकांकडे मुद्देच नसल्याने विरोधक नाथाभाऊंवर बिनबुडाचे आरोप करीत आहे असा आरोपही रवि बाविस्कर यांनी केला.
रवि बाविस्कर लोकशाहीशी बोलतांना पुढे म्हणाले बोदवड तालुक्याला प्रतिभाताईंच्या माध्यमातून महिला राष्ट्रपती मिळाल्या. खा. रक्षाताई खडसे बोदवडचे प्रतिनिधीत्व करतात आणि आता भावी आमदाराच्या रूपाने रोहिणीताई खडसे बोदवड तालुक्याला लाभणार आहेत. त्यामुळे नाथाभाऊंवर प्रेम करणारी बोदवड तालुक्याची जनता रोहिणीताईंवर त्यांच्यापेक्षा जास्तीचे प्रेम त्यांना मतदान करून केल्याचे दाखवून देतील असा विश्वासही रवि बाविस्कर यांनी व्यक्त केला आहे.