रोहिणी खडसेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

0

जळगाव : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी त्यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मी कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. त्यांनी तशा प्रकारे पोलिसांना लेखी लिहून दिले आहे. दरम्यान, रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताच अनेकजण धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यास पुढे आले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीदेखील धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

रोहिण खडसे म्हणाल्या की, कायद्याचे जे संरक्षण महिलांना देण्यात आले आहे. त्याचा कुठेही दुरुपयोग होऊ नये. एखादी महिला एखाद्या राजकीय नेत्यावर केसेस दाखल करुन त्याची प्रतिमा मलीन करत असेल तर त्यामुळे त्याचे खूप मोठे राजकीय नुकसान होते.

त्या राजकीय नेत्याने आयुष्यात कमावलेले नाव मलीन होऊन त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्याचे आयुष्य उध्वस्त होत. त्यामुळे असे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर राज्य सरकारने त्याची कसून चौकशी करावी, नंतरच कारवाई करावी, जेणेकरुन महिलांसाठी दिलेल्या प्रोटेक्शन कायद्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.