जळगाव;- जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या अध्यक्षा तथा माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या सौ.रोहिणी खडसे-खेवलकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी कु.सारा प्रांजल खेवलकर हि देखील कोरोना पॉझिटिव्ह असुन दोघींनाही जळगाव येथील सारा हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असुन. त्यांच्यावर डॉ.मिनाज पटेल, डॉ.सुयोग चौधरी, डॉ.गौरव पाटिल, डॉ.प्रांजल खेवलकर, डॉ. मोइज देशपांडे, डॉ.प्रितेश नाईक, डॉ.अभिषेक ठाकुर, डॉ.प्रभाकर पाटील, व इतर डॉक्टर उपचार करीत आहे.
सौ.रोहिणी खडसे यांच्याकडून संपर्कात आलेल्या व्यक्तींना आवाहन
माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने, मागील 7-8 दिवसात माझ्या संपर्कात अालेल्या व्यक्तींनी कोराना चाचणी करुन घ्यावी हि विनंती…
आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच कोरोनावर मात करुन, पुन्हा आपल्या सर्वांच्या सेवेत रुजु होईल असे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले . .