रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी शामकांत वाणी, सचिव ऍड.मुंदडा

0

जळगाव ः येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी शामकांत वाणी यांची तर मानद सचिवपदी ऍड. पुष्पकुमार मुंदडा यांची निवड झाली आहे.

गणपती नगरातील रोटरी हॉल येथे गुरुवार दि.5 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व सहप्रांतपाल झमनदास सैनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात रोटरी सेंट्रलचे नुतन अध्यक्ष व कार्यकारीणी रोटरी वर्ष 2018-19 साठीचा पदभार स्विकारणार आहेत. नुतन अध्यक्ष एस.के.वाणी हे शेअर्स ब्रोकर असून पुष्पकुमार मुंदडा व्यवसायाने वकिल आहेत. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष संजय तोतला व सहसचिव मनोज पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.