जळगाव प्रतिनिधी
जळगाव ईस्टचे नवनियुक्त अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील यांच्या कार्यकाळातील पहिल्या नियोजनात्मक बैठकीत विविध क्षेत्रातील 29 सभासदांना रोटरी पीन देऊन सभासद केले तसेच रोटरी जळगाव ईस्टच्या माध्यमातून झालेली सामाजिक कामे आणि पुढील कार्य काळातील कामाचे नियोजनाबाबत नुकतीच सुरभी लॉन जळगाव येथे रोटरी जळगाव ईस्टची बैठक पार पडली.
रोटरी जळगांव ईस्टचे सामाजिक कार्य प्रशंसनीय ; प्रांतपाल राजेंद्र भामरे रोटरी जळगांव ईस्टचे सामाजिक कार्य अतिशय प्रशंसनीय असुन या क्लबने सामाजिक कार्यात अनेक असे नवनवीन पायंडे पाडले आहेत, हि बाब रोटरी 3030 या प्रांताकरीता अतिशय अभिमानास्पद असुन इतर क्लबने याचे अनुकरण केल्यास काहि हरकत नसल्याचेही प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी नमुद केले. ते दोन दिवसांच्या जळगांव दौ-यावर आले होते.
सकाळी ऑफीशियल व्हीजीटनंतर त्यांनी रोटरी जळगांव ईस्टच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्यात.त्यात प्रथम गोदावरी रोट्रॅक्ट क्लबच्या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहुन त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.यावेळी सहा.प्रांतपाल तुषार फिरके, गोदावरी आयएमआर चे संचालक प्रशांत वारके, प्रा.समृध्दी रडे यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
त्यानंतर बी.जे.मार्केट परिसरातील रोटरी जळगांव ईस्ट व बुलडाणा अर्बन सोसायटी लि. च्या वॉटर एटीएमला भेट दिली.याप्रसंगी सहा. प्रांतपाल डॉ. तुषार फिरके, अध्यक्ष विनोद पाटील-भोईटे,मानद सचिव विरेंद्र छाजेड,प्रोजेक्ट चेअरमन वर्धमान भंडारी, माजी अध्यक्ष संजय शहा, संचालक जनसंपर्क मनीष पात्रीकर, संजय मुंदडा हेही उपस्थित होते.दुपारी त्यांनी रोटरी जळगांव ईस्टचा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम बोरखेडा येथील नाला खोलीकरण व रूंदीकरण प्रकल्पाला भेट दिली तिथे त्यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले.याप्रसंगी गावातील अनेक मान्यवर, डॉ प्रताप जाधव,संजय शहा, सुनील शहा, विजय लाठी, गोविंद वर्मा, मनीष पात्रीकर व रोटरी सदस्यांसह रोटरी अॅन्स देखील उपस्थित होते.
त्या नंतर सायंकाळी सुरभी लॉन येथे आयोजित नवीन सदस्य पदग्रहण सोहळ्यालाही प्रांतपाल राजेंद्र भामरे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील 29 सभासदांना रोटरी पीन देऊन सन्मानित केले.महिला सभासदांची संख्या जास्त असावी याकरीता त्यांनी सौ.रेखा विनोद पाटील व सौ.प्रियंका विरेंद्र छाजेड यांना देखिल सभासद केले.यावेळी त्यांनी प्रत्येक रोटरी क्लबने रोटरीने इन्ट्रॅक्ट क्लब, रोट्रॅक्ट क्लब, इनव्हील क्लब, कम्युनिटी सोशल क्लबची संख्या वाढविण्याबाबत देखिल त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय गाधी यांनी केले तर आभार पुढील वर्षीचे अध्यक्ष भावेश शहा यांनी मानले.बैठकीनंतर प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी मागील 3 महिनेच्या झालेल्या कामाचे कौतुक केले यामध्ये रोटरीच्या माध्यमातून झालेल्या देवराई कोल्हे हिल्स परिसरातील 65 एकर परिसरात वृक्ष रोपण झाल्यामुळे या परिसराला ऑक्सिजन हब निर्माण केले,तसेच यांनतर बैठकीतील सदस्यांना प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले.