रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेचे शानदार उदघाटन

0

डोंबिवली –
रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट च्या वतीने ऑलम्पिक 2019 स्पर्धेचे शानदार उदघाटन आज 12 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. डोंबिवली मधील 70 शाळांतील 6 हजार मुलांनी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे हे 26 वे वर्ष आहे.
डी. एन.सी. स्कूल रो. जिल्हा प्रांतपाल अँशेस गांगुली आणि डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि मशाल प्रज्वलित केली तर प्रास्ताविक अध्यक्ष विकास सनकुलकर यांनी केले. रविवार 13 जानेवारी रोजी समारोप होईल.
सहभागी संघांनी परेड करून मानवंदना दिली. तर आंतरराष्ट्रीय खेळाडू ईश्वरी शिरोडकर, अमेय शिंदे, तर राष्ट्रीय खेळाडू जान्हवी मोरे, मनंदिप सिंग यांनी मशाल मार्च करून खेळात नवचैेतन्य निर्माण केले. खोखो स्पर्धेने प्रारंभ झाला.पारंपारिक खेळ कबड्डी, लंगडी, गोळाफेक, अथलेटिक्स, योगासने बरोबर 20 स्पर्धा खेळल्या जात आहेत. प्रत्येक विजयी स्पर्धकाला मेडल व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या नियोजनासाठी अध्यक्ष विकास सनकुळकर, सचिव कौस्तुभ कशेळकर, प्रकल्प प्रमुख नारायण बोर्‍हाडे, दिलीप यादव यासह सर्व डोंबिवली ईस्ट रोटेरियन यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.