अध्यक्ष डॉ. तुषार फिरके यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट’ ट्रॉफी
जळगाव ः रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 च्या कार्यक्षेत्रातील 105 क्लबच्या वार्षिक कामगिरीबद्दल ‘पुरस्कार’ या पारितोषिक वितरण सोहळ्यात रोटरी क्लब जळगावला एकूण 16 पारितोषिके मिळाली आहेत. तर अध्यक्ष डॉ.तुषार फिरके यांनी ‘ऍड्युलजी बेस्ट प्रेसिडेंट’ व रोटरी व्हील असे दोन्ही पुरस्कार प्राप्त करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नागपूर येथे नुकताच संपन्न झालेल्या सोहळ्यात प्रांतपाल डॉ.के.एस.राजन यांच्या हस्ते व डिस्ट्रीक्ट सेके्रटरी राजेंद्र खुराणा, शशांक विश्वरुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब जळगाव चेे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके व डॉ. काजल फिरके, प्रा.डॉ.मंगला जंगले, प्रभाकर जंगले, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ऍड. प्रविणचंद्र जंगले, अशोक जोशी, सुभाष अमळनेरकर, जितेंद्र ढाके आदिंनी या पारितोषिकांचा स्विकार केला.
इंटरॅक्ट क्लब ऍवार्ड, बेस्ट सर्व्हिस टु द युथ ऍवार्ड, लिटरसी प्रमोशन ऍवार्ड, बॅलेन्स प्रोग्राम ऍवार्ड, बेस्ट क्लब बुलेटीन ऍवार्ड, बेस्ट इंटरनॅशनल ऍक्टीव्हिटीज ऍवार्ड, बेस्ट वर्क डन फॉर ट्रायबल, बेस्ट कंझ्युमर्स एर्व्हनेस प्रोजेक्ट, बेस्ट ऑफ्थोल्मिक सर्व्हिस, बेस्ट केअर ऑफ आईज, ऑऊट स्टँडींग व्होकेशनल सर्व्हिस ऍवार्ड, गर्व्हनर स्पेशल ऍप्रिशिएशन ऍवार्ड, हायस्ट रजिस्ट्रेशन इन ऍसेब्ली ऍवार्ड आदी पुरस्कार क्लबला तर क्लबचे सदस्य व सहप्रांतपाल ऍड. प्रविणचंद्र जंगले यांना ए.जी.ऍवार्ड अशा 14 पुरस्कारांचा समावेश आहे.
अध्यक्ष डॉ. फिरके यांनी 68 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या रोटरी क्लब जळगावच्या 109 सदस्यांच्या एकत्रित टिम वर्क व सर्व माजी अध्यक्षांसह छबिलदास शहा, डॉ. किशन काबरा, प्रेम कोगटा, डॉ. प्रदीप जोशी, किशोर मंडोरा, डॉ.जयंत जहागिरदार, माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची आदिंच्या मार्गदर्शनामुळे हे ऐतिहासिक यश प्राप्त करु शकलो अशी भावना व्यक्त केली. या रोटरी वर्षात माझ्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांना माझे प्रतिष्ठेचे पुरस्कार समर्पित करीत असून पत्नी डॉ. काजल फिरके यांच्या परिश्रमाला याचे श्रेय जाते असे सांगितले.
डॉ. तुषार फिरके यांनी यापुर्वी मानद सचिव असतांना ‘ऍड्युलजी बेस्ट सेके्रटरी’ व यंदा ‘ऍड्युलजी बेस्ट प्रेसिडेंट’ असे दोन्ही पुरस्कार मिळवणारे ते एकमेव व्यक्ती आहे. रोटरीच्या चतुःसुर्त्रीप्रमाणेच प्रकल्प राबविल्यामुळे रोटरी व्हील हे प्रतिष्ठेचे पारितोषिक प्रथमच जळगावातील रोटरी क्लबला प्राप्त झाले आहे. नाशिक ते नागपूर या कार्यक्षेत्रातील 105 क्लबमधून 40 पारितोषिकांंपैकी 16 पारितोषिके प्राप्त करुन रोटरी क्लब जळगावने एक विक्रमच स्थापित केला आहे.