भुसावळ (प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून आज दिनांक 29 नोव्हेबर रोजी रोटेरियन संजय अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या हस्ते कस्तुरी नगर मध्ये त्यांच्या घराच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटेरियन गजानन ठाकूर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन महेश भराडे, राजेश अग्रवाल हे उपस्थित होते
त्याच प्रमाणे रोटेरियन राधेश्याम भाऊ लाहोटी, सतीश अग्रवाल, गोपाल तिवारी, राजेंद्र पाटील, मदन बोरकर, याच प्रमाणे राधाकृष्ण प्रभातफेरीचे सदस्य शाम अग्रवाल, लीलाधर अग्रवाल, युवराज शर्मा, व रोटेरियन संजय अग्रवाल यांचे वडील नेमीचंद अग्रवाल व अजय अग्रवाल उपस्थित होते मनोज गुलाईकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.