Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»रोटरीनेच दिले समाजसेवेचे बाळकडू ; आ.संजय सावकारे
    जळगाव

    रोटरीनेच दिले समाजसेवेचे बाळकडू ; आ.संजय सावकारे

    By July 21, 2020No Comments15 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आ.संजय सावकारे व रोटरीचे उप प्रांतपाल योगेश भोळे तर भावी प्रांतपाल रमेश मेहेर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रेल सिटीचे नूतन अध्यक्ष संदीप जोशी व सचिव विशाल शाह यांनी मावळते अध्यक्ष अनिकेत पाटील व सचिव मनोज सोनार यांच्याकडून पदभार स्विकारला. अनिकेत पाटील यांच्या वतीने माजी अध्यक्ष सोनू मांडे यांनी गत वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला तर संदीप जोशी यांनी येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

    नवीन कार्यकारीणीची निवड करून नवीन सदस्य तेजस नवगळे, रजत बढे व किरण मुळे यांचे स्वागत केले. रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांचा संदेश योगेश भोळे यांनी वाचून दाखवला. आ.संजय सावकारे यांनी मार्गदर्शन करतांना त्यांच्या आमदारकीच्या व समाजसेवेच्‍या जडण घडणीत रोटरीनेच बाळकडू देऊन सिंहाचा वाटा असल्याचे स्‍पष्‍ट केले.अध्यक्षीय भाषणात रमेश मेहेर यांनी रोटरी रेल सिटी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व आगामी वर्षासाठी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन डॉ.मकरंद चांदवडकर यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास रोटरी रेल सिटीचे सदस्य,प्रांत ३०३० चे पदाधिकारी,मार्गदर्शक आदी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif