जळगाव ः येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे पाल परिसरातील आदिवासी दुर्गम भागात जामन्या, गाढर्या, उसमळी, शिरवेल, लगंडा आंबा, गारबर्डी परिसरातील आदिवासी बांधवांसाठी मोफत वैद्यकिय तपासणी शिबीर व मोफत औषधी आणि कपडे वितरणाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात 965 व्यक्तिंची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रोटरीचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. हेमंत बाविस्कर, डॉ.दिपक पाटील, डॉ. शिरिष चौधरी, डॉ. जयंत जहागिरदार, डॉ. सतिष शिंदाडकर तसेच डॉ.संजिव भिरुड, डॉ. अतुल पाटील, डॉ.मनिष चौधरी, निमाचे अध्यक्ष डॉ. सतिष चौधरी, सचिव डॉ. विकास चौधरी, डॉ. हेंमत नारखेडे, डॉ.स्वप्निल रावेरकर, डॉ. बाविस्कर, डॉ. सी.बी.त्रिपाठी, डॉ.रामचंदानी, डॉ.हर्षल त्रिपाठी व निमाच्या इतर डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.या शिबिरासाठी निमा असोसिएशन जळगावचे सहकार्य लाभले. शिबिरस्थळी रुग्णांना इंजेक्शन व सलाईन देण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यंाची जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या भागातील युवतींना रुबेलाची लस देण्यात आली.
सर्व रुग्णांना रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. किशन काबरा यांच्या सहकार्याने 300 रुग्णांना मोफत चष्मे तर क्लब व विजय जोशी आणि प्रकाश चौधरी यांच्या सहकार्याने मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. माजी अध्यक्ष छबिलदास शहा यांच्या सहकार्याने नॉनमेडिकल कमेटीतर्फे आदिवासी बांधवांना नविन कपड्यांचे वितरण देखील करण्यात आले. आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रशिक्षक हेमंत ठोंबरे यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरीचे प्रकल्प प्रमुख ऍड. प्रविणचंद्र जंगले, मानद सचिव कॅप्टन मोहन कुलकर्णी, विजय जोशी, योगेश गांधी, प्रभाकर जंगले, डॉ. सौ. मंगला जंगले, राजेश वेद, किशोर तलरेजा, डॉ. पांडुरंग पाटील, रविंद्र पाटील, डॉ. स्मिता पाटील, उदय पोतदार, संदिप शर्मा, जितेंद्र ढाके,सी.डी.पाटील, अर्चना पाटील, पंकज व्यवहारे, व नंदकुमार जंगले, प्रकाश चौधरी तसेच गाडर्याचे पोलीस पाटील तेरसिंग बारेला, जामन्याचे पोलीस पाटील छाजरसिंग बारेला, उसमळीचे पोलीस पाटील लालसिंग बारेला, सरपंच सेपाबाई बारेला, उपसरपंच काशिनाथ बारेला, वनहक्क समितीचे भरत बारेला व सर्व गृप ग्रामपंचायत सदस्यांसह रोटरी सदस्यांचे कुटुंबीय, निमा असोसिएशन ,जळगावचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.