रोटरीच्या प्रेसिडेंट इन्क्लेवपदी डॉ. राजेश पाटील यांची निवड

0

जळगाव | प्रतिनिधी 

रोटरी वर्ष 2019-20 करिता शहरातील रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट इन्क्लेवपदी बालरोग तज्ञ डॉ. राजेश पाटील यांची निवड प्रांतपाल राजेंद्र भामरे (मालेगांव) यांनी केली आहे. डॉ. पाटील यांनी 2011-12 मध्ये रोटरी वेस्टचे अध्यक्ष म्हणून तर 2016-17 मध्ये सहप्रांतपाल म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे.
आयएमएचे राज्य सहसचिव, मराठा मंगल संस्थेचे संस्थापक संचालक व महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. शहरातील सर्व सातही रोटरी क्लब त्यांच्या नेतृत्वात येत्या रोटरी वर्षात समाजोपयोगी प्रकल्प व कार्यक्रमांचे नियोजन करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.