रोजामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळतो -आ.खडसे

0

भुसावळ :- रोजामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश जातो.सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन ईप्तार पार्टीत सहभाग घेतात यातच आपल्या देशाची एकता व अखंडता दिसून येते. रोजा म्हणजे  संयम, विवेक, क्रोध यावर  नियंत्रण याचे उत्तम उदाहरण आहे .वाईट कृत्यापासून दूर राहावे याची शिकवण रोजा देतो असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री तथा आ.एकनाथराव खडसे यांनी केले. ते खडकारोड भागातील एम.आय तेली इंग्लिश मीडियम स्कूल व  भुसावळ पोलीस विभागातर्फे आयोजित रोजा इप्तार पार्टीत मार्गदर्शन करताना बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,  अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्‍यक्ष मोहम्मद हुसेन(आमीर साहेब )प्रा.डॉ. सुनील नेवे,हाजी मुन्‍ना तेली,बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, वाहतूक शाखेचे सपोनि दिपक गंधाले,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, शेख पापा शेख कालू, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, आशिक खान शेर खान, नितीन धांडे, प्रमोद सावकारे ,आदी मान्यवर  उपस्थित होते.

इफ्तार पार्टीचे आयोजन तसेच ईद मिलन यातून एकात्मतेचा  संदेश मिळतो  सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन एकोप्याने सण-उत्सव साजरे करतात अनेकतातून एकता हिच देशाची खऱ्या अर्थाने ताकत आहे असे विचार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रोजा इफ्तार प्रसंगी विचार व्यक्त केले. आ. सावकारे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, रोजा आंतरिक शक्ती वाढवतो. संयम , एकाग्रता सत्कार्यची भावना रोजा तूनच प्राप्त होते.

अल्पसंख्याक आयोगाचे माजी मंत्री मोहम्मद हुसेन, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले .प्रसंगी पोलिस दलाचे कर्मचारी, हिंदू मुस्लिम समाज बांधव, शाळेतील शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.