रोजंदारी कामगारांच्या मदतीला अभेद्या फाऊंडेशन धावून आले

0

जळगाव – प्रतिनिधी –
ज्यांच्या घरी रोजंदारीवर कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही त्यांच्यासाठी भयंकर हे दिवस. तांबापूर जळगावमध्ये आज अभेद्या फाऊंडेशनने एका चिमणीसारखे जबाबदारी स्वीकारली
कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र पूर्णपणे लॉकडाऊन झालेला आहे. केवळ महाराष्ट्र आणि देशाच नाही तर सर्व जगासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अशा परिस्थितित आपण घरी च आहोत आणि सरकार ला सहकार्य करतं आहोत.. पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्तित होतो तो त्यांचा ज्यांच्या हाता वर च त्यांची भूक असतें..रोज दरोज मजूरी करून एकदिवसाच्या जेवणाची सोय करणार्‍या त्या लोकांची, मजूरांची काय अवस्था होइल हा सर्वात मोठा प्रश्न आहे..एक जेष्ठ व्यक्ति   माणूस  म्हणून मदतीला दुता सारखी अभेद्या फाऊंडेशनला मदत करीत आहेत. जळगाव येथील झोपडपट्टी तांबापुरासारख्या भागातील लोकांना रोजगार तर नाही आहे पण भारत बंदी मुळे व भूकमारी मुळे या गोष्टीच गांभीर्य लक्षात घेता अभेद्या फाऊंडेशनतर्फे आर्थिक स्वरूपात आणि अन्न धान्याचा पुरवठा केला. या भागतील माझ्या अभेद्या फाऊंडेशन शिक्षणघरातील चिमुकल्याचा, घरी 31 तारीखपर्यत 40 घरांना आम्ही समान दिला.
1 किलो गहू पीठ 2 किलो मुगडाळ 2 किलो तांदूळ 2 किलो तुळीची डाळ 1 हळद 1 लाल तिखट
1 साबण 1 तेल  त्यांची जबाबदारी सर्वस्वी सरकार आणि आपल्या वर आहे…कोरोना विषयी जनजागृती केली व नागरिकांना सरकार द्वारा लागु करण्यात आलेल्या कलम 144 कायद्याची  माहिती देत नागरिकांना घरा बाहेर न पडण्याच्या आव्हाण संचालिका वैशाली झाल्टे व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.